Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा दिलासा – फलटणमध्ये आर्थिक मदतीचे वाटप

 


फलटण चौफेर दि २४ जून २०२५

मागील महिन्यात फलटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांवर मोठे संकट कोसळले. या आपत्तीत अनेकांचे पशुधन, घरे, शेती यांचे अतोनात नुकसान झाले. काहींची घरे पडली, काहींच्या घरात पाणी शिरले, तर काहींच्या शेती वाहून गेल्या. तसेच फळबागा, फुलशेती आणि इतर अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या गंभीर परिस्थितीत शेतकरी हतबल झाले होते.



या संकटाच्या काळात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यांनी प्रशासकीय अधिकारी, एनडीआरएफचे अधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या सदस्यांच्या मदतीने शक्य तेवढी तत्काळ मदत पोहोचविण्याचे काम केले होते आमदार सचिन पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हा  प्रश्न सरकार दरबारी प्रभावीपणे मांडला. त्यांच्या  पाठपुराव्याला यश मिळून आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून मदतीची रक्कम जमा करण्यात आली.



या मदतीचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण आज फलटण तहसील कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसीलदार गुंजवटे, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल निंबाळकर, भाजपचे तालुकाध्यक्ष अमित रणवरे, तुकाराम शिंदे तसेच नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी आमदार सचिन पाटील यांनी सांगितले की, “शासनाच्या विविध योजनांचा लाभ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना दिलासा देणे, हीच आमची जबाबदारी आहे.” 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.